बाजरी लागवड
by 𝗔𝗴𝗿𝗼𝘄𝗻𝗲𝘁™
🗂️ Productivity
Features बाजरी लागवड
बाजरी लागवड उन्हाळ्यात रोगाचा प्रादुर्भाव कमी असल्याने संरक्षित पाण्याची सोय असल्यास बाजरीपासून चांगले उत्पादन मिळवणे शक्य आहे.
त्यासाठी योग्य नियोजन करावे.
खरिपातील बाजरी पिकापासून अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याने पीक पद्धतीत बदल करीत उन्हाळी बाजरी लागवड करणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रामध्ये खानदेश, पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा विभागात उन्हाळी बाजरी घेतली जाते.या काळात उन्हाळ्यात हवामान कोरडे असल्याने अरगट, गोसावी, तांबेरा यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव कमी असतो.
त्यामुळे धान्य व चाऱ्याची गुणवत्ता चांगली मिळते.
संरक्षित पाण्याची सोय असल्यास शेतकऱ्यांच्या फायद्यात वाढ होते.जमिनीची निवड– उन्हाळी बाजरीसाठी शक्यतो सपाट मध्यम ते भारी व 6.2 ते 8 सामू असणारी निवडावी.– लागवडीपूर्वी जमिनीची खोल नांगरट करून कुळवाच्या दोन पाळ्या द्याव्यात.
दुसऱ्या कुळवाच्या पाळीच्या अगोदर चांगले कुजलेले हेक्टरी चार ते पाच टन शेणखत वापरावे.
जमीन भारी असल्यास ओलावा जास्त काळ टिकून राहतो.संकरित वाणउन्हाळी बाजरी फुलोऱ्यात येण्याच्या कालावधीमध्ये वाऱ्याचा वेग व तापमान जास्त असल्याने काही वाणांमध्ये परागीकरणाला अडचण येते.
कणसात दाणे कमी भरतात.
श्रद्धा, सबुरी असे अधिक उत्पादन देणारे तसेच केसाळ प्रकारातील अतिशय घट्ट कणीस असणारे वाण निवडल्यास पक्ष्यांचा त्रासही कमी होतो.सुधारित वाण ः आय.सी.टी.पी.
8203, डब्ल्यू.सी.सी.
75 इत्यादी.लागवड– संकरित बाजरीचे प्रमाणित बियाणे हेक्टरी चार ते पाच किलो वापरावे.
पेरणीपूर्वी प्रति 10 ते 15 किलो बियाण्यास 250 ग्रॅम ऍझोस्पिरोलिअम या जिवाणू खताची बीजप्रक्रिया करावी.
शेत ओलावून वाफसा आल्यावर पेरणी करावी.
पेरणी तीन ते चार सें.मी.पेक्षा जास्त खोल करू नये.
बाजरीची पेरणी जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात ते फेब्रुवारी दुसऱ्या पंधरवड्यात केल्यास फायदेशीर ठरते.– पेरणीस उशीर झाल्यास पीक जात किंवा वाणाप्रमाणे 50-55 दिवसांनी फुलोऱ्यात येते.
अशावेळी तापमान 42 अंश से.पेक्षा अधिक असल्यास परागकण मरतात व उत्पादनात घट होण्याची शक्यता असते.अंतर ः उन्हाळी बाजरी पेरताना दोन ओळींतील अंतर 30 ते 40 सें.मी.
व दोन रोपांतील अंतर 10 ते 15 सें.मी.
ठेवावे.
नंतर गरजेप्रमाणे विरळणी करून एका ठिकाणी एकच रोप ठेवावे.एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनअ) सेंद्रिय खते : ५ टन शेणखत / हे.
किंवा ३.५ टन उसाची मळी किंवा २.५ टन गांडुळ खत द्यावे.ब) रासायनिक खते : ५० : २५ : २५ नत्र, स्फुरद व पालाश कि.
/ हे.
द्यावीत.क) जीवाणू खते :१.
अॅझोटोबॅक्टर २५ ग्रॅ.एक किलो बियाण्यासाठी.२.
स्फुरद विरघळविणारे जीवाणू २५ ग्रॅम एक किलो बियाण्यासाठी.खते देण्याची वेळ• सेंद्रिय खते -१५ दिवस पेरणी आगोदर द्यावीत.• रासायनिक खते - ५० टक्के नत्र व संपूर्ण स्फुरद पेरणीच्या वेळी व उर्वरीत ५०% नत्र एक महिन्याने द्यावे.• जीवाणू खते - पेरणीच्या वेळी बियाण्यास चोळावीत.आंतरमशागतदोन वेळ कोळपणी व दोन वेळा खुरपणी किंवा अॅट्रॉझिन तणनाशक ०.५० कि.
प्रति हेक्टरी पेरणीनंतर पीक उगवण्यापूर्वी ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.पाणी व्यवस्थापनपहिले पाणी फुटवे येण्याचे वेळी (पेरणीनंतर २० ते २५ दिवसांनी) दुसरे पाणी पोटरीत असताना (पेरणीनंतर ३५ ते ४५ दिवसांनी) आणि तिसरे पाणी दाणे भरते वेळी (पेरणीनंतर ६० ते ६५ दिवसांनी) द्यावे.पीक संरक्षण• केवडा किंवा गोसावी १.
पीक २० ते २१ दिवसांचे झाल्यानंतर रोगट झाडे उपटून टाकावी.२.
पेरणीनंतर १४ दिवसांनी कॉपर ऑक्सीक्लोराईड ५० टक्के/हेक्टरी १ किलो ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
यानंतर ८ ते १० दिवसांनी दुसरी फवारणी करावी किंवा मेटॅलॅक्सील एम.झेड.
०.४ टक्के पेरणीनंतर २० दिवसांनी फवारावे.• अरगट :१.
प्रमाणित बियाणे वापरावे.२.
२० टक्के मीठाच्या द्रावणाची बीजप्रक्रिया करावी.३.
कणसे बाहेर पडण्यापूर्वी थायरम (०.१ ते ०.१५ टक्के) किंवा कॉपर ऑक्सीक्लोराईड ...
(२ : १) ५०० ते ६०० ग्रॅम या प्रमाणात दोन ते तीन वेळा फवारणी करावी.• सोसे अथवा हिंगे :सकाळच्या वेळी वारा शांत असताना कणसांवर मिथाइल पॅराथिऑन(फॉलीडॉल) २ टक्के भुकटी हेक्टरी २० किलो याप्रमाणात धुरळावी.खोडकिडी किंवा खोडमाशीएन्डोसल्फान ३५ टक्के प्रवाही १४ मि.ली.
१० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.लष्करी अळी किंवा केसाळ अळीमिथील पॅरॉथिऑन (फॉलीडॉल) २ टक्के भुकटी हेक्टरी २० किलो धुरळावी.
Secure & Private
Your data is protected with industry-leading security protocols.
24/7 Support
Our dedicated support team is always ready to help you.
Personalization
Customize the app to match your preferences and workflow.
See the बाजरी लागवड in Action
Get the App Today
Available for Android 8.0 and above